Pune : पंतप्रधान आवास योजनेची 11 डिसेंबर रोजी ऑनलाईन सोडत; अर्ज केलेल्या नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – पंतप्रधान आवास योजनेची ऑनलाईन सोडत येत्या दि. 11 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता काढण्यात येणार आहे. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे ही सोडत काढण्यात येणार आहे. पुणे महापालिकेकडे अर्ज केलेल्या नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

सुमारे 2 हजार 234 घरकुलांच्या वाटपासाठी ही सोडत असेल. त्यामध्ये पत्र ठरलेल्या नागरिकांना या सदनिकांचे वाटप करण्यात येणार आहे. पंतप्रधान आवास योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील योजना आहे. 2022 पर्यंत प्रत्येक नागरिकाला या योजने अंतर्गत घर देण्याचे उद्दिष्ट आहे.

या योजने अंतर्गत 8 हजारांहून अधिक सदनिका उभारण्यात येणार आहे. पुणे महापालिका हद्दीत ज्यांची कुठेही घर नाही, आशा 50 हजारांहून अधिक नागरिकांनी महापालिकेकडे घरांसाठी अर्ज केले आहेत.

हडपसर स. नं. 106 अ येथे 340, खराडी स. नं. 57 येथे 786 आणि वडगाव खुर्द येथील स. नं. 39 येथे 1 हजार 108 सदनिका असलेल्या इमारतीचे बांधकाम सुरू केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.