BNR-HDR-TOP-Mobile

Pune : दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप देण्यासाठी महापालिका सज्ज ; गणेशविसर्जनासाठी 210 ठिकाणी व्यवस्था

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- पुणे महापालिकेने दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. विसर्जनासाठी शहराच्या विविध भागांत सुमारे 210 ठिकाणी विसर्जन घाट, नदीपात्र, विहिरी, कालवे बरोबरच हौद आणि लोखंडी टाक्यांची सोय केली असून, नदीपात्रात परिसरात पालिकेचे कर्मचारी जीवरक्षक, सफाई कामगारांची नेमणूक करण्यात येणार आहे.

काल, गुरुवारी मोठ्या गाजत वाजत बाप्पाचं आगमन झाले आहे. आणि आज दीड दिवसांच्या बाप्पाचं भक्तीभावत विसर्जन केले जाणार आहे. त्यानंतर पाचव्या, सातव्या आणि दहाव्या दिवशी गणेशाचे विसर्जन केले जाते. या पार्श्वभूमीवर पालिकेकडून विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यावरणपूरक विसर्जनाचा भाग म्हणून हौद आणि लोखंडी टाक्यांमध्ये अमोनियम बायकार्बोनेट टाकण्यात येणार आहे. विसर्जनाच्या ठिकाणी विद्युत व्यवस्था छोटेखानी मांडवी उभारण्यात आले आहेत. या परिसरात जमा होणारा कचरा रोजच्या रोज उचलला जावा यासाठी महापालिका आणि स्वच्छ संस्थेचे कामगार नेमले आहेत. जागेवरच कचऱ्याचे वर्गीकरण केले जाणार आहे.

गणेशोत्सवामध्ये शहरात अंदाजे सहा लाख गणेशाची प्रतिष्ठापना होते. त्यापैकी जवळपास पाच लाख मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या असतात परंतु प्लास्टर ऑफ पॅरिस पाण्यात विरघळत नसल्याने त्यातील रासायनिक द्रव्ये विषारी असल्याने पाणी दूषित होते. ते रोखण्यासाठी महापालिका कमिंस इंडिया आणि राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा यांच्यावतीने पर्यावरण पद्धती विकसित केली आहे. अमोनियम बायकार्बोनेट ची पावडर मिसळून त्यात विसर्जन केल्यास 72 तासांत विरघळते. त्यासाठी नागरिकांना ही पावडर मोफत देण्यात येणार आहे. क्षेत्रीय कार्यालयात त्याचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.

HB_POST_END_FTR-A4

.