BNR-HDR-TOP-Mobile

Pune : आयुक्त सौरभ राव यांनी सादर केला पुणे महापालिकेचा 6085 कोटींचा अर्थसंकल्प

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- पुणे महानगरपालिकेचा 2019 -20 या वर्षाचा 6 हजार 85 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त सौरभ राव यांनी आज, गुरुवारी स्थायीसमिती समोर सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये मिळकतकरात 12 टक्के तर पाणीपट्टीत सरसकट 15 टक्के दरवाढ सुचविली आहे. आता हा अर्थसंकल्प स्थायीसमिती अध्यक्ष योगेश मुळीक फेब्रुवारी महिन्यात सर्वसाधारण सभेपुढे सादर करतील.

यावेळी महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर सिध्दार्थ धेंडे, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे, शिवसेना गटनेते संजय भोसले तसेच नगरसेवक यावेळी उपस्थित होते.

या अर्थसंकल्पात काही बदल अपेक्षित असून मिळकतकर आणि पाणीपट्टी वाढीस मंजूर दिल्यास पुणेकरांवर करवाढीचा बोजा पडणार आहे.

अंदाजपत्रकातील ठळक मुद्दे :

# केंद्र आणि राज्य शासनाच्या पुणे महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गासाठी सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी 40 कोटीची तरतूद
# नैसर्गिक आपत्ती ग्रस्त आणि अपघात ग्रस्तना तातडीच्या खर्चासाठी 1 कोटीची तरतूद
# पीएमपीसाठी 375 कोटी तरतूद
# 200 कोटीचे नवे कर्जरोखे घेणार
# HCMTR मार्गासाठी 211 कोटींची भरीव तरतूद
# उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील कचरा डेपो 1 जानेवारी 2020 ला बंद करणार
# उरुळी देवाची येथील कचरा डेपोत 1 हजार टन क्षमतेचा बायोमायनिग प्रकल्प उभारण्यासाठी चार वर्षाच्या मुदतीसाठी देखभाल दुरुस्ती करिता 15 कोटी प्रस्तावित.

HB_POST_END_FTR-A2

.