Pune : पुणेकरांवर कराचा बोजा ; मिळकत करात 12 टक्के तर पाणीपट्टीत 15 टक्के वाढीचा प्रस्ताव

पुणे महापालिकेचा 6 हजार 229 कोटींचा अर्थसंकल्प सादर

एमपीसी न्यूज- महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी आज, सोमवारी स्थायी समितीसमोर 2020 -21 चा 6 हजार 229 कोटींचा अर्थसंकल्प मांडला. यामध्ये मिळकत करात 12 टक्के तर पाणीपट्टीत 15 टक्के वाढ सुचविण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शंतनू गोयल, नगरसचिव सुनील पारखी उपस्थित होते. दरम्यान, यावेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी मोठ्या प्रमाणात दांडी मारली. हातावर मोजण्याएवढेच नगरसेवकांची उपस्थिती होती.

सविस्तर बातमी थोड्याच वेळात…..

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.