Pune : कापडी पिशव्यांच्या खरेदीसाठी नगरसेवकांकडून एक कोटीचे वर्गीकरण

एमपीसी न्यूज- महापालिकेतील अनेक नगरसेवकांनी ‘प्लॅस्टिकमुक्ती’चा ध्यास घेतला असून, नगरसेवकांच्या ‘स’ यादीतून पिशव्या खरेदी करण्यासाठी दहा-दहा लाख रुपये निधीचे वर्गीकरण करण्यात आले आहे. बारा ते तेरा नगरसेवकांकडून तब्बल 1 कोटी रुपयांच्या कापडी पिशव्या खरेदी करून नागरिकांना वाटण्यात येणार आहेत.

पर्यावरणाच्या रक्षणासाठी राज्य सरकारने राज्यात संपूर्ण प्लास्टिक बंदी केली आहे. त्यामुळे आता प्लास्टिक पिशव्या वापरणे कायद्यानुसार गुन्हा आहे. शहरातील प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे बंद व्हावा, कापडी पिशव्या वापरण्याची नागरिकांना सवय व्हावी. यासाठी अनेक नगरसेवकांनी दहा लाखांच्या निधींचे कापडी पिशव्या वाटपासाठी वर्गीकरण केले आहे. यामध्ये महिला नगरसेविका आघाडीवर असून, बचत गटांच्या महिलांकडून पिशव्या तयार करून घेण्यात येणार आहेत. यासाठी आतापर्यंत 10 ते 12 नगरसेवकांनी सुमारे एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.