Pune : मुलाच्या विवाहाचे पैसे वाचवून 14 जोडप्यांचा सामुदायिक विवाह

विष्णू हरिहर यांचा अभिनव उपक्रम

एमपीसी न्यूज – सामाजिक कार्यकर्ते आणि पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक आणि भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विष्णू हरिहर आणि नगरसेविका विजयालक्ष्मी  हरिहर यांच्या वतीने दिवंगत लक्ष्मीबाई हरिहर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या विवाहसोहळ्यात एकूण 14 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा पार पडला.

 

उच्च शिक्षित असलेल्या चिरंजीव राहुल हरिहर यांचा विवाह साधेपणाने करून विवाहसोहळ्यासाठी अनावश्यक खर्च न करता त्याच पैशांमधून विष्णू हरिहर यांनी सामुदायिक विवाहसोहळ्याचे आयोजन केले होते. बिबवेवाडी येथील सांस्कृतिक केंद्रात या 14 जोडप्यांचा विवाह सोहळा पार पडला. नववधूंसाठी मणीमंगळसूत्र, वधुवरांना भरजरी पोशाख आणि संपूर्ण यथोचित धार्मिक विधी करून नवविवाहीतांना आशिर्वाद देण्यात आला.

 

यावेळी  अक्कलकोट अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मेंजयराजे भोसले, आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर,  आमदार सिद्धार्थ शिरोळे,  माजी आमदार योगेश टिळेकर,  माजी आमदार महादेव बाबर,  भाजप सरचिटणीस योगेश गोगावले, खादी ग्रामोद्योग संचालक विद्यासागर हिरमुखे,  डीसीपी पौर्णिमा गायकवाड,  नगरसेविका आरती कोंढरे,  सम्राट थोरात, तेजेंद्र कोंढरे राजकीय व सामाजिक पदाधिकारी उपस्थित होते.

 

सामुदायिक विवाहसोहळ्याचा खर्च हरिहर कुटुंबीयानी उचलला होता. खोट्या प्रतिष्ठेसाठी विवाहाला अनावश्यक खर्च न करता मोफत सामुदायिक विवाहसोहळ्याच्या माध्यमातून चांगला संदेश देण्याचे काम विष्णू हरिहर यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.