Pune: सावरकरांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधी यांचा भाजपतर्फे निषेध ; महापालिका सभा तहकूब

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधी यांचा सोमवारी भाजपतर्फे निषेध करण्यात आला. पुणे महापालिकेची सर्वसाधारण सभाही तहकूब करण्यात आली.

यावेळी भाजपचे सर्व नगरसेवक ‘मी सावरकर’ असा मजकूर असलेल्या टोप्या डोक्यावर घालून आले होते. तर, शिवसेना आणि आरपीआय (आठवले गट) यावेळी तटस्थ होते.

भाजपच्या तहकुबी सूचनेला काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी हरकत घेतली. राहुल गांधी असे काय चुकीचे बोलले, असा सवालही शिंदे यांनी उपस्थित केला. त्यानंतर मतदान घेण्यात आले. 70 विरुद्ध 27 असे मतदान झाले. यावेळी काँगेसला राष्ट्रवादीची साथ मिळाली. तर, शिवसेना तटस्थ असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले.

सावरकरांचा विजय असो, राहुल गांधी यांचा धिक्कार असो, आशा घोषणाही भाजप नगरसेवकांतर्फे देण्यात आल्या. 19 डिसेंबर 2019 दुपारी 3 वाजेपर्यंत ही सभा तहकूब करण्यात आली. दरम्यान, आम्हाला जातीपातीच्या राजकारणापेक्षा विकास महत्त्वाचा असल्याचे आरपीआयचे (आठवले गट) नेते आणि माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी सांगितले.

_MPC_DIR_MPU_II

आम्ही सावरकर प्रेमी – शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार

आम्ही सावरकर प्रेमी असून त्यांना भारतरत्न मिळवा, ही शिवसेनेची मागणी असल्याचे शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी सांगितले. सावरकर हे देशाचे नेते होते. स्वतंत्र मिळण्यात त्यांचा मोठा वाटा होता, असेही ते म्हणाले.

भाजपने चर्चेतून पळ काढला – अरविंद शिंदे

सावरकर यांनी ब्रिटीश सरकारची माफी मागितली होती. त्या संबंधीचा कागद आपण महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत दाखविला. ही सभा तहकूब करण्यास आपला विरोध होता. या संदर्भात भाजपने चर्चा करण्याची गरज होती, मात्र त्यांनी पळ काढल्याचा आरोप काँगेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.