Pune: कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर दाट लोकवस्तीसाठी तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था

एमपीसी न्यूज  – शहराच्या दाट लोकवस्तीच्या भागात कोविड -19 बाधित लोकांच्या संख्येत वाढ होऊ लागलेली आहे. या वस्त्यांमध्ये छोट्या घरात पाचपेक्षा अधिक लोक रहातात. त्यांना फिजिकल डिस्टन्सिंग (अंतर राखणे) शक्य नसल्याने त्यांच्यासाठी पालिकेने तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था केली आहे. 

दाट लोकवस्तीतील लोकांना किमान रात्रीच्या वेळी आणि दिवसा गरजेनुसार तात्पुरता निवारा करुन देण्यात आला आहे. ही व्यवस्था फक्त निवाऱ्यापुरतीच असेल, त्यात जेवण, अंथरुण, पांघरुण या व्यवस्था ज्याच्या त्यानेच करावयाच्या आहेत, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

तात्पुरत्या निवाऱ्यात राहू इच्छिणाऱ्या नागरिकांना पोलीसांनी सहकार्य करणे आवश्यक आहे अशाही सूचना पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिल्या आहेत. उपलब्ध केलेल्या शाळांमध्ये स्वच्छता ठेवण्यासाठी सहाय्यक आयुक्त दर्जाच्या आधिकाऱ्यांची नेमणूक केली असून नगरसेवकांचे सहकार्य घ्यावे असे आयुक्तांनी म्हटले आहे.

भवानी पेठ, बिबवे वाडी, कसबा-विश्रामबाग वाडा, ढोले पाटील रोड, येरवडा-कळस-धानोरी येथील झोपडपट्ट्या, पाटील इस्टेट, कासेवाडी, पर्वती दर्शन, गुलटेकडी, लोहिया नगर या क्षेत्रीय कार्यालयांच्या परिसरात तात्पुरत्या निवाऱ्याची सोय पालिकेने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.