Pune : सीएसआरबाबत प्रशासन चुकीची माहिती देत असल्याचा अविनाश बागवे यांचा आरोप

एमपीसी न्यूज – सीएसआरच्या माध्यमातून गोळा होणाऱ्या निधीची प्रशासन चुकीची माहिती देत असल्याचा आरोप करीत काँगेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांनी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत विविध प्रश्न उपस्थित केले. महापालिका अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांना त्याबाबत समाधानकारक खुलासा करता आला नाही.

मागील अनेक महिन्यांपासून आपण या संबंधीचा पाठपुरावा करीत आहे. महापालिका प्रशासन उत्तरे देण्याचे सातत्याने टाळाटाळ करीत असल्याचे अविनाश बागवे म्हणाले. त्यावर महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी चौकशी समिती नेमून अहवाल ठेवणार असल्याचे उत्तर सर्वसाधारण सभेत दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.