Pune : महापालिकेतर्फे कोरोनासाठी 200 कोटी उपलब्ध : हेमंत रासने

PMC provides Rs 200 crore for corona: Hemant Rasane

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस बिकट होत आहे. त्याला आवर घालण्यासाठी महापालिकेतर्फे जीव ओतून काम करण्यात येत आहे. भांडवली कामांच्या निधीत 10 टक्के कपात करून कोरोनासाठी 200 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहे, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

आज, मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी निधीची कमतरता भासू नये यासाठी बजेट हेडला ही रक्कम उपलब्ध करून देण्यात आली.

महापालिकेने  कोरोना रुग्णांच्या जेवण, शिधासाठी 7 कोटी, साहित्य खरेदी, हॉस्पिटल करार 16 कोटी,  क्वारंटाईन व इतर असा साधारण 90 कोटी रुपये खर्च गेल्या तीन  महिन्यांत कोरोनासाठी केला आहे.

तसेच, सीएसआर अंतर्गत महापालिकेला 5 ते 7 कोटी रुपयांचे साहित्य मिळाले. त्यामध्ये मास्क, सॅनिटायजर, पीपीई किटचा समावेश आहे.

तर, डॉकटरांना हॉटेलमध्ये राहण्यासाठी 47 लाख रुपये तरतूद करण्यात आली आहे. त्यातील अडीच लाख रुपये खर्च झाले.

भांडवली कामांमध्ये  10 टक्के  कपात करण्यात आली असली तरी, साधारण 5 कोटी रुपयांमधून साडेचार कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत.

तसेच, ड्रेनेजच्या मेंटेनन्सची कामे क्षेत्रीय कार्यालय स्तरावरूनच करण्यात यावी, याबाबत तक्रार येऊ नये, असे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.