Pune : मिळकतधारांना पोस्टाने पाठवलेली बिले परत!

नेमका पत्ता शोधण्यासाठी महापालिकेकडून कर्मचारी नियुक्‍त करणार

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या मिळकतकर विभागाकडून शहरातील साडे सहा हजार मिळकतधारांना पोस्टाने पाठवण्यात आलेली बिले परत अली आहेत. त्यामुळे मिळकतदारांचा नेमका पत्ता शोधण्यासाठी महापालिकेकडून कर्मचारी नियुक्‍त केले जाणार आहेत.

प्रत्येक वर्षी आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर पालिकेकडून मिळकतकर धारकांना बीले पाठ्वण्यात येतात. त्यानुसार शहरातील नोंदनीकृत 8 लाख ७४ हजार मिळकतधारकांना पालिकेच्या मिळकतकर विभागाने टपाल खात्याद्वारे बिल पटवली आहेत. महापालिकेकडून 2015 पासून पोस्टाच्या माध्यमातून बिले पाठविण्यात येतात.

  • त्यापूर्वी हे काम बचतगटांच्या माध्यमातून केली जात होती. मात्र, बिले न मिळणे तसेच बिले कचऱ्यात टाकून दिली जात होती. त्यामुळे महापालिकेने हे काम पोस्टाच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर पालिकेने ही बिले योग्य पत्त्यावर जावीत. यासाठी 2 वर्षे माहिती संकलित केली असून त्यानंतर आता परत येणाऱ्या बिलांचे प्रमाण 1 टक्‍क्‍याच्या खाली आले आहे. मात्र, ही बिलेही सुमारे साडेसहा हजार असल्याचे यावर्षी समोर आले आहे.

त्यामुळे मिळकतमालकांचा शोध घेऊन त्यांचा नेमका पत्ता घेणे तसेच मिळकतकरावरील अपूर्ण पत्ते पूर्ण करण्यासाठी विभागीय पेठ निरीक्षक आणि पेठ निरीक्षकांकडे ही जबाबदारी देण्यात येणार आहे. त्यांच्या माध्यमातून संबंधित मिळकतधारकांची योग्य माहिती संकलीत करण्यात येणार असल्याचे मिळकतकर विभागाचे प्रभारी प्रमुख उपायुक्‍त सुरेश जगताप यांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.