Pune : महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी महसूल समिती 5 जानेवारीपर्यंत नियुक्त होणार : हेमंत रासने

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी महसूल समिती दि. 5 जानेवारी 2020 पर्यंत नियुक्त होणार आहे, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली.

ही समिती नियुक्ती करण्यासंदर्भात महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याशी रासने यांनी चर्चा केली. अनुभवी अधिकाऱ्यांचा या समितीत समावेश असेल. या समितीला स्वतंत्र कक्षही असेल. एकूण 15 अधिकाऱ्यांचा त्यामध्ये समावेश असेल. महापालिकेचे उत्पन्न 4 ते साडे चार हजार कोटींपर्यंतच जाते. त्यामध्ये वाढ होण्यासाठी ही समिती प्रयत्न करणार आहे. महापालिकेचा प्रॉपर्टी टॅक्स हा मुख्य स्रोत आहे. त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत. रिकाम्या जागा, बांधलेल्या जागेवर टॅक्स लागले नाही. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे रासने म्हणाले. बांधकाम, महसूल, जीएसटी असे 5 महापालिकेचे उत्पन्नाचे स्रोत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.