Pune : सत्ताधाऱ्यांच्या नियोजन अभावामुळे पुण्यात पाणी समस्या- रोहित पवार

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यात सध्या शहर आणि ग्रामीण भाग असा पाण्यावरून वाद पाहण्यास मिळत आहे. या पाण्याच्या वादाला सत्ताधारी भाजप कारणीभूत असून धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाला असताना देखील धरणातून साडेतीन टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. अशा नियोजनामुळे पुण्यात पाणी समस्या निर्माण झाली आहे. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रोहित पवार यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत सत्ताधारी भाजपवर टीका केली.

रोहित पवार म्हणाले की, पुणे जिल्ह्यात पाणी प्रश्न गंभीर नसतानाही राज्यातील अनेक भागातील प्रत्येक नागरिकाला, शेतकरीवर्गाला पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. शेतकर्‍यांच्या जनावरांसाठी चारा, पाणी यावर सत्ताधारी भाजपकडून कोणत्याही प्रकारच्या उपाय योजना केल्या जात नाहीत. सरकारकडून वारंवार सांगितले जाते की जलयुक्त शिवारच्या माध्यमातुन कोट्यवधी रूपयांची कामे झाले आहेत. मग त्याचा फायदा शेतकऱ्यांना काही प्रमाणात दुष्काळ काळात होण्याची गरज होती. मात्र केवळ घोषणा करायचे काम भाजपने केल्याची टीका रोहित पवार यांनी केली.

आगामी विधानसभा निवडणुकीत हडपसर, कर्जत जामखेडमधून निवडणूक लढविण्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे. त्यावर पवार म्हणाले की, माझा विधानसभा निवडणूक लढवायचा विचार आहे. मात्र मतदारसंघ वरिष्ठ ठरवतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.