Pune Pmp News : पीएमपीएमएल बस नव्या 12 मार्गांवर धावणार !

एमपीसी न्यूज : पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील उपनगरांंमधील नागरीकांच्या मागणीनुसार पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमीटेड (पीएमपीएमएल) च्या 70 बसगाड्या 12 नव्या मार्गांवर येत्या 12 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत.

पीएमपीएमएलच्या बसताफ्यांमध्ये भाडेतत्त्वावर 466 गाड्या दाखल झाल्या आहेत. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील उपनगरांंमधील नागरीकांची बससेवा सुरू करण्याची मागणी होती. या क्षेत्रांमध्ये औद्योगिक क्षेत्र, तिर्थक्षेत्र व पर्यटन स्थळे देखील आहेत.

त्यामुळे नव्या 12 मार्गांची निश्चिती करून त्यासाठी 70 बसगाड्या राखून ठेवण्यात आल्या आहेत. या बसगाड्या सरासरी 15, 30 मिनीटे ते 1 तासांने धावतील, अशी माहिती पीएमपीएमएल प्रशासनाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहेत.

नेमक्या कोणत्या मार्गांवर धावणार पीएमपीएमएलच्या बस…

मार्ग (बसची संख्या)
– कात्रज ते सारोळा (6)
– हडपसर ते यवत (6)
– डेक्कन ते भूगाव तांगडे मळा (4)
– वाघोली ते राहू (4)
– वाघोली ते रांजणगाव (10)
– हडपसर फुरसुंगी हडपसर वर्तुळ (4)
– हडपसर ते घोरपडी (6)
– सासवड ते जेजुरी एमआयडीसी (6)
– चाकण ते तळेगाव दाभाडे (8)
– पिंपरी ते स्पाईन मॉल (2)
– पिंपरी ते वारजे माळवाडी (6)
– चाकण ते शिक्रापूर (8)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.