Pune : पत्ता विचारण्याचा बहाण्याने पीएमपीएमएल चालकाला लुटले

एमपीसी न्यूज – पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीवरील चोरट्यांनी पीएमपीएल बसचालकाला लुटल्याची घटना काल बुधवारी (दि.10) मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास स्वारगेट येथील दुर्गा रेस्टॉरंट जवळील फुटपाथवर घडली.

याप्रकरणी दत्तात्रय कडू (वय 27, रा. जनता वसाहत, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दत्तात्रय कडू हे पीएमपीएल बसचालक असून बुधवारी मध्यरात्री ते डेपोमध्ये बस लावून आपल्या घरी पायी निघाले होते. स्वारगेट येथील दुर्गा रेस्टॉरंट जवळील फुटपाथवरुन जात असताना दुचाकीवरून तिघेजण पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्याजवळ आले आणि फिर्यादीच्या खिशातील दीड हजारांची रोकड व मोबाईल असा तब्बल साडेअकरा हजारांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून चोरून नेला.
याप्रकरणी पुढील तपास स्वारगेट पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.