Pune: शहरात 20 मार्गांवर ‘पीएमपीएमएल’ सुरू व्हावी : शंकर पवार

Pune: PMPML should start on 20 routes in the city: Shankar Pawar पीएमपी बंद असल्याने मोठ्या प्रमाणात खासगी वाहनांचा वापर सुरू झाला आहे. ज्यांच्याकडे वाहने नाहीत. त्या सर्वसामान्य नागरिकांचे मोठे हाल होत आहे.

एमपीसी न्यूज- सर्वसामान्य प्रवाशांची मोठ्याप्रमाणात गैरसोय होत असल्याने शहरात 20 मार्गांवर ‘पीएमपीएमएल’ सुरू व्हावी, असा प्रस्ताव पुणे महानगर परिवहन महामंडळाचे संचालक शंकर पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांना दिला आहे.

कोरोनाच्या संकट काळात लॉकडाऊन जाहीर केला आहे. लॉकडाऊन 5 मध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडत आहेत.

पीएमपी बंद असल्याने मोठ्या प्रमाणात खासगी वाहनांचा वापर सुरू झाला आहे. ज्यांच्याकडे वाहने नाहीत. त्या सर्वसामान्य नागरिकांचे मोठे हाल होत आहे. त्यामुळे 20 मार्गांवर पीएमपी सुरू करणे गरजेचे असल्याचे शंकर पवार यांनी सांगितले.

पुणे महापालिका, स्वारगेट, कात्रज, हडपसर, पुणे स्टेशन, विश्रांतवाडी, बालेवाडी, लोहगाव, अप्पर, वाघोली या परिसरात मुख्य रस्त्यांवर 95 बसेस, पिंपरी – चिंचवड शहरातील रस्त्यांवर 25 शटल बसेस सुरू करण्यात यावे, असे या प्रस्तावात म्हटले आहे.

या 20 मार्गांवर सकाळी 8 ते 12 व सायंकाळी 4 ते 8 या वेळेत शटल बससेवा सुरू करावी, असेही पवार यांनी सांगितले.

दरम्यान, महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही लवकरच पीएमपी सुरू होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता. येत्या 22 जून रोजी संचालक मंडळांची बैठक होणार असल्याचे समजते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.