Pune : कवी स्वप्नील पोरे यांचा गीतकार ‘मजरूह सुलतानपुरी पुरस्काराने’ सन्मान

एमपीसी न्यूज – बलराज साहनी- साहिर लुधियानी फाऊंडेशन तर्फे देण्यात येणाऱ्या ‘गीतकार मजरूह सुलतानपुरी पुरस्काराने’ ज्येष्ठ पत्रकार, चित्रपट अभ्यासक, कवी स्वप्नील पोरे यांचा महापौर मुक्त टिळक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

महाराष्ट्र साहित्य परिषदेत रविवार (दि.10) रोजी झालेल्या कार्यक्रमाला सुरेश टिकेकर, कृपाशंकर शर्मा, गिरीजा घाटगे, सोमेश्वर गणाचार्य, धनंजय कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्त्या विद्या म्हात्रे, शैलेश कुलकर्णी, तेजस तळवलकर आणि नितीन जाधव उपस्थित होते.

  • बलराज साहनी-साहिर लुधियानी फाऊंडेशन तर्फे गीतकार मजरूह सुलतानपुरी जन्मशताब्दी आणि स्वातंत्र्य सैनिक भाई टिकेकर जन्मशताब्दी निमित्त कवी स्वप्नील पोरे यांना ‘गीतकार मजरूह सुलतानपुरी पुरस्काराने’ सन्मानीत करण्यात आले. त्यांच्यासोबत सैनिकांचा देखील गौरव करण्यात आला.

यावेळी महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, ”चित्रपट रसग्रहण, कवितेच्या माध्यमातून स्वप्नील पोरे यांनी साहित्याची सेवा केली आहे. वृत्तपत्र लेखानाबरोबर कलात्मक लिखाणः करून स्वतःला व्यक्त केले आहे. हे कठीण काम असते. साहित्य, कविता लेखनातून पोरे यांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. प्रथितयश कवी, लेखक यांचा नेहमीच सत्कार होत असतो. त्यांच्यासोबत होतकरू कवी, लेखकांचा सन्मान करणे आवश्यक आहे”. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय कुलकर्णी यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.