Pune : चायनीज मांजा विक्री दाखवा ! हजार रुपये मिळवा !! पुणे पोलिसांचे आवाहन

चायनीज मांजा विक्रेत्यांच्या विरोधात पोलिसांची विशेष मोहीम

एमपीसी न्यूज- चायनीज मांजावर महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेली असतानाही हा मांजा सर्रासपणे विकला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने चायनिज मांजा विक्रेत्यांच्या विरोधात सोमवारी (दि. 13) विशेष मोहीम राबवली.

मकरसंक्राती निमित्त नागरिक पतंग उडवून उत्सव साजर करतात. पतंग उडविण्यासाठी अनेकदा चायनीज मांजा वापरला जातो. या मांजामुळे जीवघेणे अपघात होऊन पक्षी आणि अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला तर कित्येकजण गंभीर जखमी झाले आहेत.

पुणे शहर गुन्हे शाखेच्या 7 पथकांच्या द्वारे शहरामध्ये वेगवेगळया 97 ठिकाणी छापे मारुन तपासणी केली असता, चायनिज मांजा आढळून आलेला नाही. मात्र नागरिकांना चायनिज मांजा विक्री होत असल्याबाबत माहिती मिळाल्यास त्यांनी त्वरित पोलीस नियंत्रण कक्ष येथे 100 नंबर किंवा  8975283100/ 8975953100 या क्रमांकावर संपर्क करावा. असे आवाहन पुणे पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवण्यात येईल तसेच माहिती देणा-या प्रत्येक नागरिकास 1000 रुपयांचे बक्षीस देण्यात येईल असे पोलिसांनी कळवले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.