रविवार, जानेवारी 29, 2023

Pune Police : ‘चलो बैठो घुमने जाते है’ म्हणत तरुणींची छेड काढणाऱ्यांना पोलिसांनी घडवली जन्माची अद्दल, वाचा काय केलं?

एमपीसी न्यूज : वसतिगृहाच्या बाहेर थांबलेल्या (Pune Police) मुलींची छेड काढणाऱ्या रोड रोमिओना पुणे पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली. पोलिसी खाक्या दाखवत पोलिसांनी छेड काढणाऱ्या या तरुणांना तुरुंगाची हवा दाखवली. पुण्याच्या कोथरूड परिसरात हा सर्व प्रकार घडला.

याप्रकरणी अधिक माहिती अशी, की कोथरूड परिसरातील एका वसतिगृहाच्या बाहेर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तीन तरुणी आल्या होत्या. नेमके त्याचवेळी बाहेर असणाऱ्या कारमध्ये दोन तरुण बसले होते. यातील एकाने या तरुणीकडे पाहून ‘चलो बैठो घुमने जाते है’ असा आवाज दिला. अनपेक्षित घडलेल्या या प्रकाराने या मुली काहीशा घाबरल्या. मात्र, त्यावेळी त्यांनी तिथून निघून जाणे पसंत केले. काही अंतरावर गेल्यावर त्यांनी हा सर्व प्रकार पुणे पोलिसांना सांगितला.

पुणे पोलिसांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली. यातील एका मुलीने त्या कारचा नंबर मात्र लक्षात ठेवला होता. त्या आधारे पोलिसांनी तासाभराच्या आत या कारचा शोध घेतला आणि या दोन तवा खुराना चांगलीच अद्दल घडवली. त्या दोघांवर गुन्हे दाखल करत त्यांना तुरुंगात धाडले.

विशेष म्हणजे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी देखील या घटनेची (Pune Police) दखल घेतली. पुणे पोलिसांच्या ट्विटर अकाउंट वरून या घटनेचा दाखला देत मजेशीर ट्विट करण्यात आले. ‘चल बैठो घुमने जाते’ कोथरूडमध्ये हॉस्टेल बाहेर कारमध्ये बसलेल्या दोघा तरुणांनी 3 मुलींना ‘कॅज्युअल’ बोललेले शब्द #PunePolice ने मात्र ‘कॅज्युअली’ घेतले नाहीत. अशा प्रकारचा दाखला देत पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेबाबतीत कुठलीही तडजोड करणार नसल्याचे स्पष्ट संकेतच या निमित्ताने दिले आहे.

Today’s Horoscope 06 December 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

Latest news
Related news