Pune : ब्राऊन शुगर विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अटक

तब्बल 12 लाखांची ब्राऊन शुगर जप्त

एमपीसी न्यूज – ब्राऊन शुगर विक्रीसाठी आलेल्या तरुणाला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून अटक करून त्याच्याकडून तब्बल 12 लाख 69 हजार रुपये किंमतीचे 255 ग्रॅम 260 मिली ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई शुक्रवारी(दि. 31) रात्री इंदिरानगर झोपडपट्टी येथील
रस्त्यावर करण्यात आली. 

अशोक अर्जुन जाधव (वय 34, रा. इंदिरानगर, पुणे), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक हा पुणे शहरात मोठ्या प्रमाणात ब्राऊन शुगरची विक्री करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनिल दोरगे यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून  इंदिरानगर येथील झोपडपट्टीमध्ये अशोकला अटक करण्यात आली व त्याच्याकडून 12 लाख 69 हजार रुपयांचे
255 ग्रॅम 260 मिली ब्राऊन शुगर हस्तगत करण्यात आले.

ही कामगिरी पोलीस उप आयुक्त ज्योती प्रिया सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.