Pune Crime News : घरमालकांना बेशुद्ध करून चोरी करणारी मोलकरीण जेरबंद, घरात सापडले तब्बल 61 लाख

एमपीसी न्यूज – घरकाम करणाऱ्या एका महिलेला पुणे पोलिसांनी अटक केली. ही महिला उच्चभ्रू सोसायट्यांत ज्येष्ठ नागरिकांच्या घरी मोलकरीण म्हणून कामास जायची. त्यानंतर दोनच दिवसानंतर गुंगीचे औषध देऊन त्यांना बेशुद्ध करत सोने-चांदी अन् रोकड चोरून न्यायची. पोलिसांना या महिलेच्या घरात तब्बल ६१ लाखांचा ऐवज सापडला असून पोलीस देखील आवाक झाले आहेत.

शांथी चंद्रन (वय ४३, रा. अन्नाई नगर, वेगनीकल, तिरूलअन्नमलई, तमिळनाडू) असे अटक केलेल्या मोलकरीणीचे नाव आहे. याप्रकरणी मधुबाला प्रवीण सेठिया (वय ६०, रा. वानवडी) यांनी तक्रार दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादीच्या घरी घरकाम करण्याच्या बहाण्याने आलेल्या या महिलेने कपाटात ठेवलेले १० लाख ५२ हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. दरम्यान, वानवडी पोलिसांनी शांथी हिला तामिळनाडूतून अटक केली आहे. शांथीने पुणे शहरातील कोरेगाव पार्क, बंडगार्डन, येरवडा, खडक, समर्थ, लष्कर, वानवडी आणि कोंढवा या पोलिस ठाणे हद्दीतील उच्चभ्रू सोसायट्यांत घर कामगार म्हणून केले आहे. एखाद्या ठिकाणी मोलकरीण म्हणून चार ते पाच दिवस काम केल्यानंतर ती विश्‍वास संपादित करत असे, त्यानंतर गुंगीचे औषध खाद्यपदार्थांत घालून घरातील दागिने चोरून नेण्याची नित्यक्रम शांथीचा ठरलेला असे.

याप्रकरणी तिला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला २४ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.