Pune Police : पुणे पोलिसांनी उधळला खूनाचा कट; शस्त्रासह आरोपींना अटक

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या (Pune Police) रागातून एकाचा मंगळवारी (दि.17) खून करणार असल्याची खबर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा एक यांना मिळताच पोलिसांनी वेळीच कारवाई करत दोघांना शस्त्रासह अटक केली. 

समीर सलीम शेख (वय 19, रा.कोंढवा) व शाहिद फरीद शेख (वय 26, रा. कोंढवा) व त्यांचे तीन अल्पवयीन साथीदार यांना पोलिसांनी त्यांच्या जवळील कुऱ्हाड, कोयता व एक तलवार असा 2 हजार 300 रुपयांची शस्त्रे पोलिसांनी जप्त केली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा एकचे पोलीस अंमलदार अनिकेत बाबर यांना खबर मिळाली की, कोंढवा येथील खलीद सैय्यद याचे काही महिन्यापूर्वी त्याच्या ओळखीचा मुलगा सलमान याच्याबरोबर भांडण झाले होते. तेव्हा सलमान याने ‘तुला संपवून टाकेन’ अशी धमकी दिली होती. तसेच, तेव्हापासून तो व त्याचे साथीदार जवळ घातक शस्त्रे बाळगून आहेत. ते मंगळवारी कोंढवा येथील गोयल गार्डन (Pune Police) येथे पत्र्याच्या शेडमागे जमणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपींना शस्त्रासह ताब्यात घेतले व खूनाचा कट उधळून लावला.

Chakan Crime News : जमीन मोजणीसाठी आलेल्यांना जीवे मारण्याची धमकी देत मारहाण

ही कारवाई गुन्हे शाखा एकचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदिप भोसले, पोलीस उपनिरीक्षक अजय जाधव, सुनिल कुलकर्णी, पोलीस अंमलदार अनिकेत बाबर, अभिनव लडकत, अय्याज दड्डीकर, इम्रान शेख, तुषार माळवदकर, विठ्ठल साळुंखे, महिला पोलीस अंमलदार, रुक्साना नदाफ यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.