Pune: कोंढव्यातील हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उघडकीस ; दोन परदेशी युवतींची सुटका

एमपीसी न्यूज- कोंढव्यातील एका उचभ्रु सोसायटीमध्ये चालणाऱ्या हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करून पोलिसांनी दोन परदेशी मुलींची सुटका केली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई शुक्रवारी (दि. 24) रात्री 11 च्या सुमारास कोंढव्यातील शालिमार हिल्स सोसायटीमध्ये करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील शालिमार हिल्स सोसायटीमध्ये परदेशी मुलींना ठेवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती अशी माहिती कोंढवा पोलीस ठाण्याचे हवालदार तोगे यांना मिळाली होती. तोगे यांनी ही माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महादेव कुंभार यांना कळवल्यानंतर कुंभार यांनी सहकाऱ्यांसोबत जाऊन याठिकाणी छापा टाकला. त्यावेळी या फ्लॅटमध्ये आढळून आलेल्या दोन मुलींकडे चौकशी केली असता पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी सादर मुलींची सुटका करून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.