रविवार, जानेवारी 29, 2023

Pune Crime : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचे कोंम्बिंग ऑपरेशन

73 आरोपींना केले अटक

एमपीसी न्यूज –  प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्तालयाने 24 ते 25 जानेवारी या कालावधीत कोंम्बिंग ऑपरेशन राबवले आहे ज्यामध्ये पोलिसांनी (Pune Crime) एकूण 3 हजार 715 जणांची तपासणी केली असून त्यात 650 गुन्हेगार मिळून आले त्यातील 73 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

यामध्ये पोलिसांनी हॉटेल, लॉजेस, ढाबे, एस.टी. स्टॅन्ड, रेल्वे स्थानके, इतर सार्वजनिक ठिकाणे यांची तपासणी केली. यावेळी बेकायदा शस्त्र बाळगल्याच्या 28 केसेस पोलिसांना आढळल्या. त्यात 37 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यात 34 कोयते, 2 सत्तूर,1 तलवार अशी 11 हजार 550 रुपयांची शस्त्रे जप्त केली.

अंमली पदार्थ विरोधी पथकाने खडकी येथे एनडीपीएस अक्ट अंतर्गत कारवाई करत 4 लाख 22 हजार 240 रुपयांचा 21 किलो 112 ग्रॅम गांजा  जप्त केला आहे. (Pune Crime) तसेच येरवडा येथे 2 लाख 3 हजार 800 रुपयांचे 10 ग्रॅम 190 मिलीग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन जप्त केले आहे. विश्रांतवाडी येथील कारवाई मध्येही 1 लाख 3 हजार रुपयांचा 5 किलो 150 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. मुंढवा येथे ही एकाकडून 2 हजार रुपयांच्या 100 ग्रॅम वजनाच्या हिरवट रंगाच्या बिया जप्त केल्या आहेत.

याबरोबरच कोंढवा येथे दोन हुक्का पार्लवर छापे टाकले असून यात 12 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जुगारच्या 14 केसेस केल्या असून यात 78 जणांना ताब्यात घेतले असून 1 लाख 99 हजार 365 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.  तर 6 जणांवर तडीपारीची कारवाई कऱण्यात आली आहे.

Pune : मार्व्हल्स, चित्ता, गनर्स, ऑलस्टार ‘सेव्हन अ साईड सिटी प्रिमियर लीग’ फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत

या पुर्ण ऑपरेशनमध्ये 592 हॉटेल, ढाबे, लॉज तसेच 171 बस स्टॅन्ड, रेल्वे स्थानक, निर्जन स्थळे यांची तपासणी करण्यात आली आहे.

पोलीस ठाण्याकडून 1 हजार 463 संशयित वाहनचालकांना तपासले असून 82 जणांवर कारवाई करत 37 हजार 600 रुपयांचा दंड वसूल केला आहे. (Pune Crime) तर वाहतूक पोलिसांनी 1 हजार 61 संशयीत चालकांना तपासून 154 जणांवर कारवाई करत 1 लाख 7 हजार 900 रुपयांचा दंड वसूल केला आहे.

या कारवाईमध्ये पोलिसांनी एका अल्पवयीन मुलालाही आर्म अक्ट अतंर्गत ताब्यात घेतले आहे. यापुढेही अशीच कारवाई केली जाणार असून नागरिकांनी कायद्याचे पालन करत शांतता राखण्यात पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी केले आहे.

Latest news
Related news