Pune News : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचे कोंम्बिग ऑपरेशन

एमपीसी न्यूज : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात 19 जानेवारी रोजी रात्री 9 ते 20 जानेवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या (Pune News) दरम्यान पोलिसांनी कोंम्बिग ऑपरेशन राबवले आहे. यामध्ये 3 हजार 683 गुन्हेगारांची शहरभरात तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 709 गुन्हेगार मिळून आल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

कोबिंग ऑपरेशन अंतर्गत गुन्हे शाखेने 13 केसेस व पुणे पोलिस स्टेशनने 24 केसेस अशा एकूण 37 आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून 27 कोयते, दोन चाकु, तीन तलवार, एक कुऱ्हाड व तीन दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Pune News : ‘महाराष्ट्र केसरी’सह विजेत्या मल्लांना बक्षिसांचे वितरण

पोलीस स्टेशनकडून नाकाबंदी दरम्यान एक हजार 446 संशयित वाहन चालकांची तपासणी करुन 32 जणांवर 20 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करणयात आली आहे.(Pune News)तर, वाहतूक शाखेकडून एक हजार 22 संशयित वाहन चालकांना चेक करुन 115 जणांवर 75 हजार 800 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.

यापुढेही कोंम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येणार असून गुन्हेगारांचे हालचालींवर सक्त नजर ठेवून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीसांनी सांगितले आहे.

महाराष्ट्र पोलीस कायदा 142 प्रमाणे एकूण आठ तडीपार गुन्हेगारांवर देखील कारवाई केली गेली. पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील एकूण 532 हॉटेल, ढाबे, व लॉजेस चेक तसेच 171 एसटी स्टॅण्ड, रेल्वे स्थानक,निर्जन ठिकाणे तपासणी करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.