Pune : पीएम रिपोर्ट बदलण्यासाठी लाच मागणारा पोलीस कर्मचारी बडतर्फ

एमपीसी न्यूज – मृत महिलेचा शवविच्छेदन अहवाल (पीएम रिपोर्ट) बदलण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस हवालदाराने तीन लाख रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी पुणे शहर पोलिसांनी हवालदाराला अटक केली असून पुणे ग्रामीण पोलीस दलातून त्या हवालदाराला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाने याबाबतचे आदेश काढले. पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस हवालदार राजेंद्र आर्य यांनी एका मयत महिलेचा शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी एका महिलेकडे तीन लाख रुपयांची मागणी केली. तीन लाख रुपयांची लाच स्वीकारताना पोलिसांनी आर्य यांनी पकडले.

याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. तसेच बंडगार्डन पोलिसांनी आरोपीला 6 ऑगस्ट रोजी अटक देखील केली. या प्रकरणाची पोलीस अधीक्षक संदीप यांनी गांभीर्याने दखल घेतली. शासकीय सेवकास अशोभनीय वर्तन केल्याप्रकरणी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी लाच मागणा-या पोलीस हवालदाराला सेवेतून बडतर्फ केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.