Pune News : पुणे पोलिस शिपाई चालक पदाच्या पात्र उमेदवारांची लेखी परिक्षा रविवारी

एमपीसी न्यूज – पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या (Pune News) पोलीस शिपाई चालक पदाच्या लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी पुणे पोलिसांच्या www.punepolice.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना  रविवारी (दि.26) सकाळी साडे सहा वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

संबंधित उमेदवारांनी मॉडर्न कॉलेज शिवाजीनगर येथील महा-आयटी विभागाकडून लेखी परीक्षेसाठी ऑनलाइन उपलब्ध करून दिलेले प्रवेशपत्र डाऊनलोड करावे. लेखी परीक्षेसाठी येताना सोबत हे प्रवेशपत्र, वाहनचालक परवाना, आधार कार्ड किंवा अन्य कोणतेही शासकीय ओळखपत्र आणि काळ्या रंगाच्या बॉलपेन असावा

 

Chakan News : चाकण येथून 2 लाख 94 हजारांचा गुटखा जप्त, पाच जणांना अटक

 

लेखी परीक्षा 26 मार्च रोजी सकाळी साडे आठ वाजता सुरू होणार आहे. (Pune News) परंतु दोन तास अगोदर म्हणजे सकाळी साडे सहा वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन पोलिस उपायुक्त (मुख्यालय) रोहिदास पवार यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.