Pune : परस्पर दुस-या जिल्ह्यात छापा टाकणा-या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचा-यावर निलंबनाची कारवाई

एमपीसी न्यूज – पुणे ग्रामीण पोलीस दलात स्थानिक गुन्हे शाखा विभागात कार्यरत असताना परवानगीशिवाय बेकायदेशीररीत्या दुस-या जिल्ह्यात जाऊन लाखो रुपयांचा गुटखा आणून त्याची विक्री केली. याबाबत संबंधित पोलीस कर्मचा-यावर पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.

पोपट मुरलीधर गायकवाड असे निलंबित केलेल्या पोलीस कर्मचा-याचे नाव आहे. पोलीस नाईक पदावर पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेत तो कार्यरत होता.

रविवारी गायकवाड याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने अहमदनगर जिल्ह्यातील निघोज ता. पारनेर येथील एका गुटख्याच्या गोडाऊनवर छापा टाकला. या छाप्यात त्यांनी पाच लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. पकडलेल्या सगळा गुटखा आणून त्याची परस्पर विक्री केली. या प्रकरणाची पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी गांभीर्याने दखल घेतली. गायकवाड याचे वर्तन गुन्हेगारांशी संधान असल्याने त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.