BNR-HDR-TOP-Mobile

Pune : महिला भंगार विक्रेत्याकडून पोलीस हवालदारासाठी लाच स्वीकारणाऱ्या इसमास रंगेहाथ पकडले

507
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- चोरीचा माल खरेदी करत असल्याचा आरोप करून याबाबत तक्रारी आल्या आहेत असे सांगून कारवाई न करण्यासाठी तक्रारदार महिलेकडून पोलीस हवालदारासाठी 5 हजारांची लाच स्वीकारणाऱ्या एका इसमाला रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज, गुरुवारी हडपसर येथे ही कारवाई केली.

निसार मेहमुद खान (वय 44 पोलीस हवालदार वानवडी पोलीस ठाणे) व मेहंदि अजगर शेख (वय 32, रा. हडपसर पुणे ) अशी या प्रकरणी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेचे आनंदनगर हडपसर पुणे येथे भंगाराचा व्यवसाय आहे. तक्रारदार हिचेवर चोरीचा माल खरेदी करत असल्याचा आरोप करून याबाबत तक्रारी आल्या आहेत असे सांगून कारवाई न करण्यासाठी व भंगाराचा धंदा पुढे चालु ठेवावयाचा असेल तर आरोपीनी संबंधित महिलेकडे 15 हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती 5 हजार रुपये देण्याचे ठरले. पोलीस हवालदार निसार मेहमुद खान याच्यासाठी सदरची रक्कम स्वीकारताना मेहंदि अजगर शेख याला ताज फर्नीचर हडपसर येथे रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक वर्षाराणी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजू चव्हाण, चंद्रकांत चौधरी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ढवणे, पोलीस हवालदार शेळके, पोलीस नाईक झगडे याची केली.

.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3