Pune : तोडफोड प्रकरणी 185 जण पोलिसांच्या ताब्यात; दगडफेकीत पाच पोलीस जखमी

480

एमपीसी न्यूज- मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बंद दरम्यान गुरुवारी झालेल्या तोडफोड प्रकरणी पोलिसांनी 185 पोलीस कर्मचारी जखमी झाले.

पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वार तोडून येथे तोडफोड केली. संतप्त झालेल्या आंदोलकांनी चांदणी चौकात पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकीत पाच पोलीस कर्मचारी जखमी झाले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.

पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयात केलेल्या तोडफोडी प्रकरणी 5 महिलांसह 76 जणांना, डेक्कन जिमखाना परिसरात रास्तारोको करणाऱ्या 21 जणांना आणि चांदणीचौकात दगडफेक केल्या प्रकरणी 83 जणांना असे एकूण 185 जणांना ताब्यात घेतले आहे. या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

HB_POST_END_FTR-A2
%d bloggers like this: