Pune Police : लोहमार्ग पोलीस शिपाई पदाच्या भरतीच्या अर्जासाठी मुदतवाढ

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा लोहमार्ग पोलीस दलाच्या (Pune Police) जिल्ह्यातील पोलीस शिपाई पदाच्या 124 जागा निघाल्या आहेत. या जागांच्या अर्जासाठी लोगमार्ग पोलीस प्रशासनाकडून मुदत वाढ देण्यात आली असून आता 15 डिसेंबर पर्यंत इच्छूकांना अर्ज करण्यात येणार आहेत.

यासाठी पुणे लोहमार्ग पोलीस अधिक्षक सदानंद वायसे पाटील यांनी भरती प्रक्रियेबाबत परीपत्रक काढून माहिती दिली आहे. त्यात म्हटल्यानुसार, सन 2020 ते 2021 या वर्षातील पोलीस शिपाई या पदाच्या रिक्त जागांसाठी ही भरती होणार आहे. यासाठी सुरुवातीला अर्ज 30 नोव्हेंबरपर्यंत हे अर्ज भरता येणार होते. मात्र, अर्ज भरण्यासाठी सहा दिवसांची मुदत वाढवून ती 15 डिसेंबर करण्यात आली आहे, ज्यामुळे अर्ज करु इच्छिणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Talegaon : कलापिनी तर्फे संस्थापक कै. डॉ. शं. वा. परांजपे यांच्या स्मृतीला नाट्य वाचनाद्वारे वंदन

यासाठी www.policerecruitment2022.mahait.org तसेच www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर त्यांचे अर्ज भरता येणार (Pune Police) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.