Pune Police : महिला पोलिसाची भर रस्त्यात हमालाला मारहाण

एमपीसी न्यूज : पुणे पोलीस (Pune Police) आयुक्तालयातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरातील उरुळी कांचन परिसरात एका महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी हमालीचे काम करणाऱ्या एका व्यक्तीला शिवीगाळ करत त्याला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Pune Police : पोलीस निरीक्षकाची एकाला बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. किशोर निवृत्ती गरड (वय 35) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, भारती होले असं मारहाण करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. त्या उरुळी कांचन पोलीस चौकीत कार्यरत आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, उरुळी कांचन (Pune Police) परिसरातील एका रस्त्यावर असणाऱ्या किराणा दुकानात माल उतरण्याचं काम गरड करत होते. यावेळी महिला पोलिसांनी रस्त्यात टेम्पो का उभा केला? असं विचारत गरड यांना मारहाण करण्यास सुरुवात केली, असं प्रत्यक्षदर्शी नागरिकांकडून सांगण्यात आलं. यावेळी माफी मागण्याचा प्रयत्न करणाऱ्या गरड यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या वागणुकीचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.