Pune : बंडगार्डन पुलाची एनओसी वाहतूक पोलिसांकडून एप्रिलपासून प्रलंबित – डॉ. सिध्दार्थ धेंडे

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. त्यामध्ये बंडगार्डनचा एक पूल धोकादायक बनला असून त्याचे जॉईन्ट्स बदलावे लागणार असल्याचा अहवाल देण्यात आला आहे. याबाबत वाहतूक पोलीस उपायुक्त यांच्यासह पोलिसांना पत्र दिले आहे. पण, ही परवानगी एप्रिलपासून प्रलंबित आहे, अशी माहिती माजी उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे यांनी सर्वसाधारण सभेत दिली. पुणे महापालिकेची विकासकामे करताना पोलिसांची एनओसी अडचण ठरत असून नगरसेवकांच्या भावना तीव्र असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

_MPC_DIR_MPU_II

पुलाच्या दुरुस्ती कामाची निविदा काढण्यात आल्यानंतर त्याचा कार्यादेशही देण्यात आला आहे. दुरुस्तीचे साहित्यही येऊन पडले आहे. परंतु वाहतूक उपायुक्त, सहायक आयुक्त आणि निरीक्षकांनी तेथील राज्य शासनाने विकसित केलेले बेट काढा मगच परवानगी देऊ अशी अट घातली आहे, असेही डॉ. धेंडे म्हणाले.

यावर आपण पोलिसांकडे विकासकामांची परवानगी मागत नाही, केवळ त्यांना माहिती देत आहे. त्यामुळे यापुढे एनओसी मुळे कोणतेही काम थांबू नये, असे महापौरांनी स्पष्ट केले. याबाबत परिपत्रक काढून, पोलीस आयुक्तांशी चर्चा करण्याचे आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांना देण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.