Pune : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्मृतिभ्रंश झालेल्या ज्येष्ठ महिलेच्या नातेवाईकांचा शोध.

"भरोसा" अंतर्गत ज्येष्ठ महिलेला पोलिसांची मदत...!

एमपीसी न्यूज – सर्वसामान्य जनते समोर पोलीस म्हटले की , एक कठोर मनाचा बलदंड देहयष्टीचा कर्तव्य कठोर अशी प्रतिमा असते. परंतु ज्या प्रमाणे काळ बदलत चाललेला आहे , त्याप्रमाणे नवनवीन युवक पोलीस विभागामध्ये आपली सेवा बजावण्या करीता येउ लागले आहेत . शिक्षित असल्याचे प्रमाण वाढल्याने विचार करण्याची व समाजामध्ये आपले स्थान निर्माण करण्याची भावना वाढीस लागली आहे. कठोर मनाच्या जागी हळव्या मनाने जागा घेतलेली आहे व ज्या पोलीस काकांना लहान मुले , सर्व सामान्य माणसे या पूर्वी घाबरत होती . त्या काकांशी नागरीक स्वतःहून बोलू लागले आहेत.
स्थळ : दत्तवाडी पोलीस स्टेशन , पुणे ,  वेळ: – रात्रीचे 12 : 00
 संपूर्ण रस्त्यावर कडाक्याची थंडी मुळे नागरिकांची येजा थांबलेली . अशा वेळेस रात्र गस्त अधिकारी आपल्या रात्रीच्या दैनंदिन काम काजाचे नियोजन करुन पोलीस स्टेशनच्या बाहेर पडले असतांनाच पर्वती दर्शन पोलीस चौकीतून एक फोन आला व त्यामध्ये कळविण्यात आले की , एक महिला जिचे नाव मुक्ताबाई लोंढे वय अंदाजे 75 वर्षे असावे . हि पर्वती दर्शन परिसरात दिशाहीन फिरत असल्याने तिला स्वतःचे घर नातेवाईक या बाबत काही माहिती सांगता न आल्याने नागरीकांनी पोलीस चौकीमध्ये आणलेले आहे . हे समजताच रात्र गस्त अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अश्रूदेव पवार यांनी पर्वती दर्शन चौकीत जाऊन त्या महिलेची माहिती घेतली . तिने सांगितल्या प्रमाणे परिसरामध्ये ते स्वतः पोलीस हवालदार सोपान नावडकर , पोलीस नाईक मंगेश खेडकर यांनी जाऊन पाहिले असता त्या आजींचा स्मृतीभ्रंश झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
हि घटना त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांना कळविली. माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर के.वेंकटेशम यांनी ज्येष्ठ नागरिक ,बालक,व महिलां करिता सुरू केलेल्या “भरोसा” या योजने अंतर्गत या ज्येष्ठ महिलेस पूर्णपणे मदत करण्याचे ठरल्याने त्या प्रमाणे नियंत्रण कक्ष येथे कळविण्यात आले की , अशा वर्णनाची महिला कोठे हरवली आहे का? परंतु संपूर्ण नियंत्रण कक्षातील अधिकारी व कर्मचारी पूर्ण शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशनला या महिलेबाबत माहिती देत होते. परंतु कोठेही अशी महिला हरवली असल्याची नोंद नसल्याने अडचण निर्माण झाली.
श्री देविदास घेवारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तवाडी पोलीस स्टेशन यांनी रात्र गस्त अधिकारी व कर्मचारी यांना वेळोवेळी सूचना देऊन ज्येष्ठ महिलेस तिच्या नातेवाईकांपर्यंत पोहचविण्याची दक्षता घ्या . मतदार यादी चेक करा, व तिला थंडीत कोणताही त्रास होऊ देऊ नका असे सांगितले .
सदरची महिला ही अत्यंत वयस्कर असल्याने व थंडीच्या कडाक्यामध्ये खूप थंडी वाजत असल्याने तिला पोलिसांकडील गरम कपडे दिले.त्या खूप वेळ भटकल्याने  त्यांना भुक लागली होती.  त्या वेळी कॉफी आणि बिस्कीट दिले.

त्या प्रमाणे पोलीस उप – निरीक्षक अश्रूदेव पवार व मंगेश खेडकर यांनी कडक थंडीत पोलीस स्टेशन हद्दीत महिलेच्या नातेवाईकांचा शोध घेतला परंतु यश न मिळाल्याने  मंगेश खेडकर पोलीस नाईक यांनी भारत निवडणूक आयोगाच्या ऑनलाइन मतदार यादीमध्ये शोध घेतला आसता,  पर्वती विधानसभा मतदार संघाच्या मतदार यादी मध्ये आंबेडकर नगर ,मार्केट यार्ड ,पुणे येथे त्यांचे नातेवाईकांचा व त्यांचा पत्ता मिळाला.  त्या प्रमाणे सदर पत्त्यावर जाऊन शोध घेता महिलेची मुलगी साखराबाई भालके या मिळून आल्याने त्यांना आपली आई दत्तवाडी पोलिस स्टेशन येथे सुखरूप आहेत असे सांगितले.तुम्ही इतर नातेवाईकांसह चला त्या प्रमाणे साखराबाई भालके व इतर नातेवाईक सकाळी 6:00 वाजता दत्तवाडी पोलिस स्टेशन येथे आल्या.व त्यांनी आपल्या आईला सुखरूप पाहिल्यावर डोळ्यात अश्रू तरळले.
                                                                   
साखराबाई भालके यांच्याकडे चौकशी करता त्यांनी सांगितले की,5 वर्षांपूर्वी आंबेडकर नगर , झोपडपट्टी येथे आग लागल्याने बऱ्याच घरांचे नुकसान झाले.  त्या मध्ये माझ्या आईचे घर जाळाल्याने तिचे मानसिक संतुलन बिधडल्याने तिला एखादी गोष्ट पटकन आठवत नाही.त्या मुळे कदाचित ती चुकून रस्ता भटकल्याने या ठिकाणी आली असावी.ती अशीच चुकून कोठे तरी जायची पण पुन्हा परत घरी यायची .त्यामुळे आम्ही ती हरवली असल्या बाबत तक्रार दिली नव्हती.
वरील जेष्ठ महिलेच्या नातेवाईकांच्या शोध कार्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) कृष्णा इंदलकर , पोलीस उपनिरीक्षक अश्रुदेव पवार , पोलीस हवालदार सोपान नावाडकर , पोलीस नाईक मंगेश खेडकर , पोलीस कॉन्स्टेबल शरद राऊत , महिला पोलीस कॉन्स्टेबल सरोज देवर , माधवी पवार यांनी सहभाग घेतला होता .
वरील महिलेच्या नातेवाईकांची शोध मोहिम कडक थंडीच्या वातावरणामध्ये बाहेर कोणीही माहिती सांगण्याकरीता उपलब्ध नसतांना प्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन मा . पोलीस आयुक्त , पुणे शहर यांच्या भरोसा ‘ या संकल्पनेला अनुसरुन 8 तासामध्ये पुर्ण करुन वरील महिलेला तिच्या नातेवाईकांच्या सुखरुप ताब्यात दिले .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.