Pune : रस्त्याच्या मधोमध रिक्षा उभी करून रिक्षाचालकाची वाहतूक पोलिसाशी हुज्जत

एमपीसी न्यूज – रस्त्याच्या मधोमध उभी केलेली रिक्षा बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरून एका रिक्षाचालकाने वाहतूक पोलिसाशी हुज्जत घातली. हा प्रकार बुधवारी (दि.5) कोंढवा येथील सत्यानंद हॉस्पिटल समोर सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली.

याप्रकरणी कोंढवा वाहतूक विभागाचे पोलीस नाईक विलास किरवे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास किरवे हे कोंढवा येथील सत्यानंद हॉस्पिटल समोर वाहतूक नियमनाचे काम करत होते. दरम्यान एका रिक्षाचालकाने स्वतःची रिक्षा रस्त्याच्या मधोमध लावली होती. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन तेथे वाहतूक कोंडी झाली होती.

त्यामुळे विलास किरवे यांनी रिक्षाचालकाला रिक्षा बाजूला घेण्यास सांगितले. त्यावरून रिक्षाचालकाने ‘रिक्षा माझी आहे. मी बाजूला घेणार नाही, मी इथला भाई आहे’ असे म्हणत किरवे यांना शिवीगाळ केली. रिक्षाचालकावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.