Pune Crime : पुणे पोलिसांनी 65 जणांवर लावाला मोक्का तर 42 गुन्हेगारांना केले तडीपार

एमपीसी न्यूज- पुणे पोलिसांनी आरोपींवर कारवाईचा (Pune Crime) बडगा उगारला असून यामध्ये 9 गुन्हेगार टोळ्यांमधील 65 गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली असून 42 जणांवर तडीपारीची कारवाई केली आहे.

पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांच्या कारवाईवर आळा बसवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्या अतंर्गत आत्ता पर्यंत 3 हजार 700 सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

Pimpri Crime News : घरातून फोन चोरणाऱ्याला अटक

यात मुख्यत्वे करून एनपीडीए अॅक्ट अंतर्गत कोल्हापूर व नाशिक येथील कारागृहात तिघांना स्थानबद्ध केले आहे. तर रेकॉर्डवरील 42 गुन्हेगारांवर पुणे व पिंपरी-चिंचवड हद्दीतून तडीपार केले आहे. तसेच 9 टोळ्यांमधील 65 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. यापुढेही ही कारवाई अशीच चालू राहील असे पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.