Pune Police News : खून प्रकरणातील चौकशीसाठी उत्तर प्रदेशात गेलेल्या पुणे पोलिसांच्या पथकावर जमावाकडून हल्ला

एमपीसीन्यूज : पुण्यातील बुधवार पेठ परिसरात काही दिवसांपूर्वी एका सराईत गुन्हेगाराने पोलीस हवालदार समीर सय्यद याचा निर्घुण खून केला होता. याप्रकरणी पोलिसांनी सराईत गुन्हेगार आणि सध्या तडीपार असलेला आरोपी प्रवीण महाजन याला ताब्यात घेतले होते. याच प्रकरणातील आणखी एका संशयित महिलेची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेशात गेल्या पोलिसांच्या पथकावर जमावाकडून हल्ला करण्यात आला.

या खून प्रकरणात सहभाग असल्याच्या संशयावरून एका महिलेची चौकशी करण्यासाठी फरासखाना पोलिस स्टेशनचे एक पथक तीन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे गेले होते. येथील संशयित महिलेच्या घरी विचारपूस सुरू असतानाच या ठिकाणी जमलेल्या टोळक्याने पोलिसांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

आरोपींनी लाकडी काठ्या आणि लोखंडी गजाने पोलिसांच्या गाडीची तोडफोड केली. पोलिसांना देखील मारहाण करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.