Pune : जेवण मिळाले नाही म्हणून रात्र गस्तीवर असलेल्या पोलिसांवर हल्ला

एमपीसी न्यूज : रात्री उशिरापर्यंत सुरू असणारे चायनिज सेंटर बंद करण्यासाठी गेलेल्या पुणे पोलीस दलातील एका (Pune) कर्मचाऱ्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात हा पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे.

विमानतळ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील लोहगाव परिसरात ही घटना घडली. पोलीस नाईक सचिन उत्तम जगदाळे (वय 38) असे जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात महानंदेश्वर उर्फ मल्या महादेव बताले (वय 24, रा. नळदुर्ग, जि. उस्मानाबाद) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, तक्रारदार रात्र गस्तीवर होते. यादरम्यान, लोहगाव येथील धानोरी जकात नाका येथील समायरा चायनिज सेंटर रात्री अडीच वाजता देखील सुरू होते. हे सेंटर पोलीस कर्मचारी सचिन व त्यांच्या सहकार्यांनी बंद केले. त्याचदरम्यान, महानंदेश्वर हा त्याठिकाणी जेवणासाठी (Pune) आला होता. सेंटर बंद केल्याने त्याला जेवण मिळाले नाही. त्याचा राग आल्याने त्याने सेंटरमधील चाकू घेऊन सचिन यांच्यावर हल्ला केला.

Bhosari : भोसरी एमआयडीसी परिसरात स्वच्छता अभियान आणि वृक्षरोपण

त्यांच्या गालावर चाकू मारल्याने ते यात गंभीर जखमी झाले असून, त्यांचा गाल फाटला गेला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.