Pune Police Orders : कायदा व सुव्यवस्था पाहता 14 दिवसांसाठी पुणे पोलिसांनी घातली ‘या’ कृत्यांवर बंदी

एमपीसी न्यूज : सध्याचे वातावरण (Pune Police Orders) पाहता, पुणे पोलीस आयुक्तालय मार्फत 28 जून ते 11 जुलैपर्यंत 11 दिवसांसाठी काही बंधने जाहीर करण्यात आली आहेत. हे आदेश जारी करणाऱ्या पत्रात पोलीस उपायुक्त आर. राजा यांनी म्हंटले आहे, कि पुणे शहरात जनतेच्या विविध मागण्यांसाठी विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना मोर्चे, धरणे, निदर्शने, उपोषण तसेच बंद यांसारखे आंदोलन करतात. विविध कारणांमुळे तसेच अतिक्रमण हटवण्याच्या कारवायांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. यामुळे पुणे शहरात पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था राखणे अत्यावश्यक आहे. यासाठी काही बंधने पुणे पोलीस जाहीर करत असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) आणि (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. हे नियम 28 जून रोजी 1 वाजल्यापासून ते दिनांक 11 जुलै रोजी बारा वाजेपर्यंत 14 दिवसांसाठी लागू राहतील.

पुढे दिलेल्या कृत्यांवर पुणे पोलिसांच्या आदेशान्वये मनाई करण्यात आली आहे – Pune Police Orders

  • कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ ज्वलनशील द्रव पदार्थ बरोबर नेणे.
  • दगड अथवा शस्त्र किंवा अस्त्रे तसेच सोडायचे अस्त्रे किंवा फेकायची अस्त्रे किंवा साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे.
  • तलवारी, दंड, काठ्या, बंदुका आणि शारीरिक इजा करण्यासाठी वापरण्यात येणारी कोणतीही वस्तू बरोबर नेणे.
  • कोणत्याही इसमाच्या चित्रांचे, प्रतीकात्मक प्रेताचे, पुतळ्याचे तसेच पुढाऱ्यांच्या चित्राचे, प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करणे.
  • मोठ्याने अर्वाच्च घोषणा देणे. वाद्य वाजवणे.
  • सभ्यता अगर नीतिमत्ता याच धोका पोहोचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे किंवा अविर्भाव करणे.
  • कोणतेही जिन्नस तयार करून त्याचा जनतेत प्रसार करणे.

PCMC News : प्रभागरचनेविरोधातील विलास मडिगेरी यांच्या याचिकेची निवडणूक आयोगाकडून दखल, आयुक्तांना दिला ‘हा’ आदेश

वरील सर्व कृत्यांवर पोलिसांमार्फत बंदी घालण्यात आली आहे. या दरम्यान शासन किंवा महानगरपालिका आयुक्त पुणे यांच्या कोरोना विषयक प्रतिबंधक उपाययोजना व मार्गदर्शक तत्वे व त्यातील तरतुदी हे देखील या दरम्यान लागू राहतील. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे 37 पोटकलम (३) नुसार पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास बंदी घालण्यात आली आहे. पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यात सहभाग घेण्यास किंवा मिरवणूक काढण्यास बंदी (Pune Police Orders) घालण्यात आली आहे.

वरील संपूर्ण आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही.

सदर आदेशाचे जर कोणीही उल्लंघन केले तर संबंधित व्यक्तीवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951चे कलम 37 (1) आणि (3) प्रमाणे शिक्षा अथवा कारवाई करण्यात येणार असे, पोलीस उपायुक्त आर. राजा यांनी म्हंटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.