Pune Police : अटक होऊ नये म्हणून आरोपीकडून लाच घेताना पोलीस शिपाई अटक

एमपीसी न्यूज –  चोरीच्या गुन्ह्यात आरोपीकडून 2 लाख (Pune Police) रुपयांची लाच मागून ती स्वीकारत असताना पुणे पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने पोलीस शिपायाला त्याच्या साथीदारांसह अटक केली आहे.

दीपक प्रल्हाद क्षीरसागर (वय 34 ) व त्याचा साथीदार सिमोन अविनाश साळवी (वय 27) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची मोबाईल शॉपी आहे. त्यांनी चोरीचे मोबाईल खरेदी केले  होते. या प्रकरणात आरोपीला अटक करू नये म्हणून क्षीरसागर याने 2 लाख रुपयांची लाच मागितली. तसेच लगेच त्यातील 40 हजार रुपये दे अशी सक्ती केली. त्यानुसार तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक  विभागाने  मंगळवारी (दि.29) गुन्हेशाखा 3 च्या कार्यालयात सापळा रचला व क्षीरसागर याला साथीदार साळवीकडून  30 हजार रुपये स्वीकारताना रंगे हात पकडले.

पोलिसांनी पुढे क्षीरसागर यालाही अटक केले असून याचा पुढील तपास  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर करत आहेत.

Borghat Accident News : बोरघाटात भीषण अपघात; ट्रेलरच्या धडकेत दोन ट्रक पडले दरीत, एकाचा मृत्यू

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.