Pune Police : पोलीस निरीक्षकाची एकाला बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल

एमपीसी न्यूज : पुणे पोलीस (Pune Police)

दलातील सामाजिक सुरक्षा विभागाच्या एका पोलीस निरीक्षकाने एका व्यक्तीला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांचा हा व्हिडिओ असल्याचा दावा केला जातोय. या व्हिडिओत संबंधित पोलीस अधिकारी काही नागरिकांना बेदम मारहाण करताना दिसतोय. तर त्यांना अश्लील शिवीगाळ देखील केली जाते.

Mumbai-Pune : मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर नागनाथजवळ दरड कोसळली

सामाजिक सुरक्षा विभागाचे (Pune Police) पोलीस अधिकारी राजेश पुराणिक सध्या शहरातील अवैध धंद्यांवर कारवाई करताना दिसतात. मागील काही दिवसांपासून शहरात चालू असणाऱ्या अवैध धंद्यांवर त्यांनी सातत्याने कारवाया केल्या आहेत. याच कारवायादरम्यानचा हा व्हिडिओ असल्याचं आता सांगितले जाते. एका जुगार अड्ड्यावर छापा टाकल्यानंतर पुराणिक यांनी त्या ठिकाणी सापडलेल्या व्यक्तींना मारहाण केली असल्याचा दावा केला जातो.

अतिशय अमानुषपणे हे पोलीस अधिकारी संबंधित व्यक्तींना मारहाण करत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. तसेच त्या ठिकाणी असणाऱ्या इतर व्यक्तींना हे पोलीस अधिकारी अश्लील भाषेत शिवीगाळ करत असल्याचे दिसून येते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने आता एकच खळबळ उडाली आहे. या व्हिडिओवर पोलीस दलातून अजून स्पष्टीकरण आलेलं नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.