Pune Police: पुणे पोलिसांच्या दौड स्पर्धेत वैष्णवी जाधव व रोहीत जाधव यांनी पटकवाला प्रथम क्रमांक

एमपीसी न्यूज : स्वातंत्र्याच्या अमृतमोहत्सवी उपक्रमांतर्गत पुणे पोलीस व नागरिक यांची दहा किलो मीटरची दौड रविवारी (दि.14) आयोजीत केली होती.(Pune Police) यामध्ये महिला गटात प्रथम क्रमांक सहायक पोलीस निरीक्षक वैष्णवी जाधव यांनी तर पुरुष गटात प्रथम क्रमांक पोलीस अंमलदार रोहीत जाधव यांनी पटकावला आहे.

पुणे पोलीस व नागरिकांमधील सुसंवाद वाढावा यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने या दौडचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमासांठी आंतरराष्ट्रीय किर्तीचे नेमबाज खेळाडू अंजली भागवत, बजाज फिनसर्व्ह कंपनीचे टिम लिडर, पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहा पोलीस आयुक्त, संदिप कर्णिक आदी उपस्थित होते. ही दौड सकाळी सहा ते आठ या दोन तासाच्या कालावधीत पार पडणार आहे. याची सुरूवात शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालय येथून सुरु होऊन कृषी महाविद्यालय गेट जवळील चौकातून सिमला ऑफीस,जंगली महाराज रोड,संभाजी पूलावरून गुडलक चौक पुढे बीएमसी रोडवरून सिम्बॉयसीस कॉलेज, पत्रकार चौक त्यानंतर सेल पेट्रोलपंपापासून पुन्हा पोलीस मुख्यालय अशी झाली.

Wakad Burglary : वाकड येथे घरफोडीत दिड लाखांचे दागिने चोरीला

अंजली भागवत यांच्या हस्ते विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.यामध्ये महिला गटात द्वितीय क्रमांक पोलीस अमंलदार शिला जाधव व तृतीय क्रमांक रुपाली दळवी तसेच वैशाली हगरुडे यांना मिळाला. पुरुष गटात द्वितीय क्रमांक सतिश लांडगे व तृतीय क्रमांक पोलीस अमंलदार राहूल चव्हाण यांनी पटकवला.(Pune Police) याबारोबरच महाराष्ट्र शासनाचा शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त करणारे सहायक पोलीस निरीक्षक सुजाता शामने, पोलीस उपनिरीक्षक गंगा जगताप, सहायक पोलीस फौजदार शंकरराव पाटील, सहायक पोलीस फौजदार प्रसाद मोकाशी, पोलीस शिपाई संतोष घाडगे यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.जे. तरुण यांनी केले तर आभार पोलीस उपआयुक्त विवेक पाटील यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.