Pune : महादेव बेटिंग ॲप प्रकरणी नारायणगावमध्ये पोलीसांची छापेमारी ; 70 ते 80 जणांना घेतले ताब्यात

एमपीसी न्यूज – महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पुण्यातील नारायणगावमध्ये ( Pune)  पोलीसांनी छापेमारी केली आहे. परदेशासह देशातील इतर राज्यातल्या छापेमारी नंतर महादेव ऑनलाइन बेटिंग ॲपची कामं पुण्याच्या नारायणगावामधून सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर पुणे ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने नारायणगाव  येथे छापेमारी केली . नारायणगावातील एका इमारतीत या काम सुरू असून या प्रकरणात  70 ते 80 जणांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे.  नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये याचा तपास सुरु आहे.

Pune : पुण्याच्या माजी महापौर रजनी त्रिभुवन यांचे निधन

महादेव बुक ॲपचा संस्थापक सौरभ चंद्राकरने  मित्र रवी उप्पलसोबत ‘महादेव ऑनलाईन ॲप ‘ सुरू केलं होतं.   या ॲपवर ऑनलाईन बेटिंग केली जाते. सौरभ चंद्रकारचा फेब्रुवारी 2023 मध्ये, संयुक्त अरब अमिरातीमध्ये  शाही विवाहसोहळा पार पडला. त्याच्या शाही विवाह सोहळ्यात परफॉर्म करण्यासाठी मोठमोठे सेलिब्रिटी आले होते. या लग्नाच्या शाही थाटामुळे आणि खर्चामुळे हे लग्न ईडीच्या निशाण्यावर आलं आणि त्यानंतर मनी लॉन्ड्रिंगचं सर्वात मोठं नेटवर्क उघड झाले.

ईडीच्या विनंतीवरून केंद्र सरकारने महादेव बेटिंग ॲपवर  बंदी घातली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने  महादेव बुक ॲपवर बंदी घातली आहे. या अगोदर महादेव बेटींग ॲप प्रकरणात अनेक कलाकारांची नावे देखील नावं पुढे ( Pune) आली होती.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.