Pune : कोथरूड येथे हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा; मालक, मॅनेजरसह दोन वेटर गजाआड

एमपीसी न्यूज- पुण्यातील कोथरूड येथील रॉयल लॉन्ज गार्डन रेस्टोरंटमध्ये बेकारदेशीरपणे सुरु असलेली दारू विक्री आणि हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज छापा टाकला. यात सुमारे 45 हजार 535 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

तसेच याप्रकरणी रॉयल लॉन्ज गार्डन रेस्टोरंटचे मालक जुनेद असागरअली अन्सारी (वय 35, रा. दुरानी कॉम्प्लेस्क, मिठानगर, कोंढवा, पुणे), मॅनेजर तुषार प्रमोदकुमार सबलोक (वय 31, रा. पेरिव्हिकल सोसायटी, बाणेर-पाषाण, पुणे) आणि दोन वेटर त्यातील दिन मोहम्मद शेख (वय 21 रा. रॉयल लॉन्ज गार्डन रेस्टोरंट, मूळ गाव शाळीग्राम, जि नादिया, पश्चिम बंगाल) आणि अब्बास रियाहूल शेख (वय 31, रा. रॉयल लॉन्ज गार्डन रेस्टोरंट, मुलगारू तेहत्तो, जि. नादिया. पश्चिम बंगाल) यांच्या विरुद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

  • याबाबत मिळालेली माहिती अशी, गुन्हे शाखा युनिट-4 च्या पोलिसांना कोथरूड येथील रॉयल लॉन्ज गार्डन रेस्टोरंटमध्ये हुक्का पार्लर सुरु असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पौड रोड वरील कचरा डेपोजवळील येथील रॉयल लॉन्ज गार्डन रेस्टोरंटमध्ये छापा टाकला. यावेळी पोलिसांना सहा इसम सोफ्यावर हुक्का, धूम्रपान करीत असल्याचे दिसून आले. तसेच दोन कामगार, दिन मोहम्मद शेख (वय 21 रा. रॉयल लॉन्ज गार्डन रेस्टोरंट, मूळ गाव शाळीग्राम, जि नादिया, पश्चिम बंगाल) आणि अब्बास रियाहूल शेख (वय 31, रा. रॉयल लॉन्ज गार्डन रेस्टोरंट, मुलगारू तेहत्तो, जि. नादिया. पश्चिम बंगाल) ग्राहकांना सर्व्हिस करीत असल्याचे आढळून आले. यावेळी सहा ग्राहकांवर सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने अधिनियमनुसार कारवाई केली आहे.

तर,कॉउंटरवर वेगवेगळ्या कंपनीच्या दारूच्या बाटल्या दिसल्या. यावेळी मालक अंसारीकडे दारूविक्री बाबत परवाना आहे का? विचारल्यानंतर त्याने परवाना नसल्याचे सांगितले. यावेळी विर्कीसाठी ठेवलेल्या सुमारे 23 हजार 935 रुपये किमतीची इंडियन मेड फॉरेन लीकरचे 7 बॉक्स तसेच 21 हजार 600 रुपये किमतीचे हुक्का फ्लेवर, हुक्का पॉट, आणि त्यासाठी लागणारे साहित्य असा सुमारे 45 हजार 535 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत कोथरूड पोलीस ठाण्यात मालक, मॅनेजर आणि दोन वेटरवर गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.