Pune : कोरेगाव पार्क भागातील बेकायदेशीर हुक्का पार्लरवर छापा

एमपीसी न्यूज – कोरेगाव पार्क येथील हॉटेल डार्क हॉर्समध्ये चालू असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा टाकून हॉटेल मालक आणि मॅनेजरच्या विरोधात गुन्हा दाखल केला. ही कारवाई मंगळवारी (दि.16) दुपारी सव्वाएकच्या दरम्यान करण्यात आली.

प्रदीप प्रकाश परदेशी व सुरज पिटर थापा अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्क येथील डार्क हॉर्स या हॉटेलमध्ये अनधिकृतरित्या हुक्का पार्लर चालू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हॉटेलवर छापा घातला असता तेथे काही तरुण तरुणी हुक्का ओढताना आढळून आले. तसेच सुरक्षेचा विचार न करता तेथील कामगार निखारे हुक्का पॉटवर ठेवताना दिसले. हॉटेलमध्ये कोणत्याही प्रकारची अग्निशमन यंत्रणेची व्यवस्था केली नव्हती त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची देखील शक्यता दिसून आली.

पोलिसांनी या ठिकाणी असलेल्या जवळपास 20 तरुण तरुणींवर खटले भरून हॉटेल मालक आणि मॅनेजरवर गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी पुढील तपास कोरेगाव पार्क पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.