Pune : मसाज सेंटरवर छापा टाकून सेक्सरॅकेटचा पर्दाफाश

एमपीसी न्यूज – मसाजच्या नावाखाली चालणारे सेक्सरॅकेट उघडकीस आणून पोलिसांनी दोन मुलींची वेश्याव्यवसायातून सुटका केली. ही कारवाई औंध येथील आयटीआय रस्त्यावरील ‘विवांत फॅमिली थाई स्पा’ या मसाज सेंटरमध्ये गुरूवारी (दि.6) करण्यात आली.

प्रसाद सुरेश कांबळे (वय 29, रा.केशवनगर चिंचवड), डेव्हीड ऊर्फ डेमखोसेह हाऊकिप (वय 27, रा. कोंढवा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंध येथील आयटीआय रोडवरील ‘विवांत फॅमीली थाई स्पा’ या मसाज सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे यांना पोलीस हवालदार नरेश बलसाने आणि ज्ञानेश्वर देवकर यांच्याकडून मिळाली.

त्यानुसार या माहितीची खातरजमा करून या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून दोन महिलांची वेश्याव्यवसायातून सुटका केली. या कारवाई दरम्यान साडेसहा हजारांची रोकड, मोबाईल फोन, ड्रायव्हींग लायसन्य स्पा रेटकार्ड तसेच वेश्याव्यवसायासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

ही कारवाई सामाजिक सुरक्षा विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिता खेडेकर, पोलीस उपनिरीक्षक योगिता कुदळे, नरेश बलसाने, ज्ञानेश्वर देवकर, नामदेव शेलार, अनुराधा धुमाळ, गीतांजली जाधव, रूपाली चांदगुडे, सुनील नाईक, रेवनसिद्ध नरोटे, संदीप गायकवाड तसेच चतु:श्रृगी पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक वैशाली गलांडे, पोलीस उपनिरीक्षक कोळी आणि कर्मचाऱ्यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.