Pune : मटका, जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सात जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – अंमली पदार्थ विरोधी पथकाने स्वारगेट पोलिस स्टेशन हद्दीमध्ये शिवनेरी रोड वरील ढोणे सर्व्हिस सेन्टरचे मागे, मार्केट यार्ड, ट्रक पार्किंगमध्ये नाल्या लगत सुरु असलेल्या मटका, जुगार अड्ड्यावर छापा टाकून सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांच्याकडून सुमारे एकूण 14,300/- रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.

अविनाश देवकुळे, गजानन शिंदे, अभिमन्यू अडागळे, रहीम शेख, भीमा चव्हाण, आकाश इंगळे, शब्बीर शेख अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस उप निरीक्षक ढोले हे दि.02/03/2020 रोजी स्टाफसह पेट्रोलीग करीत होते. यावेळी त्यांना मिळालेल्या माहितीनुसार स्वारगेट पोलिस स्टेशन हद्दीमध्ये शिवनेरी रोड वरील ढोणे सर्व्हिस सेन्टरचे मागे, मार्केट यार्ड, ट्रक पार्किंगमध्ये नाल्या लगत सुरु असलेल्या मटका, जुगार अड्ड्यावर छापा टाकला.

यावेळी वरील सातजण जाग्यावर मटका, जुगार खेळताना आढळले. यावेळी पथकाने त्यांच्याकडून सुमारे एकूण 14,300/- रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त करून गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.