Pune : पावणेनऊ लाखांचा देशी-विदेशी मद्यासाठा जप्त; पुणे पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

एमपीसी न्यूज – पुणे पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाने कोरेगाव पार्क येथील एका रेस्टो बारवर छापा मारून 8 लाख 84 हजार 915 रुपयांचा देशी-विदेशी मद्यासाठा जप्त केला.

कलीमउद्दीन रियाजुद्दीन शेख (रा. लेन नंबर 4, कोरेगाव पार्क, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांना माहिती मिळाली की, सतरंज रेस्टो अँड बार, कोरेगाव पार्क याठिकाणी लॉकडाउन काळातही चोरून दारूची विक्री सुरू आहे. याची खात्री करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवले.

त्यानंतर पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांच्या उपस्थितीत खात्री करून पोलीस उपनिरीक्षक निलेशकुमार महाडिक, पोलीस कर्मचारी मगर, चिखले, बागवान यांच्या पथकाने उत्पादन शुल्क विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय पाटील यांच्या सोबत छापा टाकला.

पोलिसांनी एकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 8 लाख 84 हजार 915 रुपये किमतीची देशी, विदेशी मद्यासाठा जप्त केला. याबाबत कोरेगाव पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 188, 269, 270, 273, प्रोहिबिशन अॅक्ट कलम 65 (ई) 82, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 (1) (ब), महाराष्ट्र कोविड 19 नियम 2020 कलम 11, संसर्गजन्य रोग कायदा 1897 कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.