Pune Crime News :  कोंढव्यात हुक्का गोडाऊनवर पोलिसांचा छापा; 22 लाखाचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – मुंढवा पोलिसांनी येवलेवाडी परिसरातील एका हुक्का गोडाऊनवर छापा मारून कारवाई केली. या ठिकाणाहून पोलिसांनी 22 लाख 17 हजार रुपये किंमतीचा हुक्का आणि इतर साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

शहेजाद अश्रफ रंगूनवाला (वय 37), नवेद मुंने खान (वय 21) आणि शरीफ मोहम्मद मालापुरी (वय 18) या तिघांना याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम 2018 चे कलम 4 अ 21 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील कर्मचारी येवलेवाडी परिसरात पेट्रोलिंग करत होते. पोलीस नाईक तुषार आल्हाट यांना एका इमारतीच्या पार्किंगच्या जागेमध्ये हुक्क्याचे गोडाऊन असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून पोलिसांच्या एका पथकाने या ठिकाणी छापा मारला. त्यावेळी त्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हुक्का तसेच हुक्क्याचे साहित्य आढळून आले. पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.