Pune : पुण्यातील 12 नामांकित स्टार हॉटेल्स आणि हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा

पुणे पोलिसांची पहिल्यांदाच हुक्का जॉईंट्सवर एवढी मोठी कारवाई

एमपीसी न्यूज – पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुण्यातील तब्बल 12 नामांकित स्टार हॉटेल्स आणि हुक्का पार्लरवर काल मध्यरात्रीनंतर छापा टाकला. यावेळी 6 ते 7 हजार तरुण तरुणी या ठिकाणी होते. ही कारवाई काल (शनिवार) रात्री एक ते आज रविवार पहाटे चार या कालावधीत करण्यात आली. या हॉटेल्स आणि हुक्का पार्लरवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी पहिल्यांदाच हुक्का जॉईंंट्सवर एवढी मोठी कारवाई केली आहे.

कोरेगाव पार्क, मुंढवा, आणि चतुःश्रूंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मॅकलारेन्स पब, डेली ऑल डे, द बार स्टॉक एक्सचेज, वायकी, नाईट राईडर, नाईट स्काय, वेस्टीन, पेंटाहाऊस, हार्डरॉक, ओकवूड लाँज, ब्ल्यू शॅक, मयामी जे.डब्ल्यू मेरिएट या हॉटेल्स आणि हुक्का पार्लरवर ही कारवाई करण्यात आली. त्यांच्यावर वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त देशपांडे सर आणि पोलीस उपायुक्त ज्योतीप्रिया सिंग यांच्या नियंत्रणात करण्यात आली. कारवाईत सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश मोरे आणि भानुप्रताप बर्गे यांच्यासह 6 पोलीस निरीक्षक, 6 पोलीस उपनिरीक्षक आणि 40 पोलीस कर्मचा-यांनी सहभाग घेतला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.